सहारनपूर दंगल अहवालात भाजपला ठरवले जबाबदार

0
84

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील धार्मिक हिंसाचाराची चौकशी करणार्‍या मंत्री शिवपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने या प्रकरणी प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे सांगतानाच भाजपची भूमिका असल्याचा संशयही व्यक्त केला. दंगलीत तिघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा राजकीय फायदा उठविण्याचा समाजवादी पार्टीचा डाव असल्याचे सांगून भाजपने कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीप्रमाणे अहवालात म्हटले आहे की, भाजपच्या स्थानिक खासदाराने लोकांना भडकवले त्यामुळे दुकानांना आगी लावण्याचे प्रकार घडले व दंगल चिघळली. २६ जुलैला झालेल्या या दंगलीनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समितीचे गठन केले होते.