सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

0
8

राज्यातील सर्व धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा असून, कच्च्या पाण्याचा कोणताही तुटवडा नसल्याचे काल जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जून महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी राज्यातील धरणांमध्ये असल्याचे ते म्हणाले. गोवा सरकार 2025 पर्यंत राज्यात 100 नवे बांध बांधणार असल्याचा पुनरुच्चारही यावेळी शिरोडकर यांनी केला. या घडीला साळावली धरणात 28 टक्के, तिळारी धरणात 32 टक्के, अंजुणे धरणात 16 टक्के, चापोली धरणात 46 टक्के, आमठाणे धरणात 34 टक्के, पंचवाडी धरणात 18 टक्के, तर गावणे धरणात 46 टक्के एवढे पाणी असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.