सर्व घटकांसाठी गृहनिर्माण योजना

0
108

>>डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

केवळ दलितांनाच नव्हे तर समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी गृहनिर्माण योजना आपले सरकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या सोहळ्याच्यावेळी सांगितले. 

अर्थसंकल्पात प्रत्येक तालुक्यात आंबेडकर भवन उभारण्याची तरतूद आहे. त्याच्या आधारे भवन उभारणे शक्य आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. मागास जमातीसाठी असलेल्या २१ योजनांचा अनुसूचित जातीना लाभ दिला जात आहे, असे ते पुढे म्हणाले.
सध्या ३४ पंचायतींमध्ये मागास जमातीसाठी पंचायत प्रभाग आरक्षित आहेत यापुढे जमातीचे लोक असलेल्या सर्व पंचायतीमध्ये एसटीसाठी प्रभाग राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
डॉ. आंबेडकर हे प्रतिभावंत व प्रज्ञावंत होते. या देशासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. परंतु नेहरूंच्या सरकारात त्यांच्यावर अन्याय झाला. पं. नेहरू यांनी डॉ. आंबेडकर यांना दलितांपुरतेच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला, असे वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉ. आंबेडकरांची अध्यक्षपदी निवड करण्याचे काम महात्मा गांधीनीच केले होते. त्यांच्याच शिफारसीमुळे ते समितीचे अध्यक्ष बनले, असे प्रा. भास्कर नायक यांनी सांगितले.