राज्यातील सर्व कोमुनिदादींच्या कामात सुसुत्रता आणली जाईल, त्यासाठी सर्व कोमुनिदादींवर पूर्णवेळ प्रशासकांची नियुक्त करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. त्याशिवाय सर्व कोमुनिदादींचे संगणीकरण केले जाणार असून, त्यांना आवश्यक तो कर्मचारी वर्गही पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
काल राज्यभरातील कोमुनिदादींच्या समिती सदस्यांच्या शिष्टमंडळांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. कोमुनिदादींना संगणक ऑपरेटर्स व कारकुनांची आवश्यकता आहे. त्याशिवाय त्यांचे दस्ताऐवज सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना वेगळ्या कारकुनांची गरज आहे. सरकार त्यांना आवश्यक तो सगळा पाठिंबा देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.