सर्व्हर हॅक करून ९ लाखांना गंडा

0
13

सायबर गुन्हेगारांनी आरबीएल बँकेचा सर्व्हर हॅक करून ग्राहकांना सुमारे ९.२४ लाख रुपयांचा गंडा घातला. आरबीएल बँकेच्या पणजी, म्हापसा, कळंगुट आणि मडगाव येथील एटीएम मशीनशी जोडलेले बँक सर्व्हर सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बँकेच्या २९ ग्राहकांच्या डेबिट कार्डाचा वापर करून बँक खात्यातून ९.२४ लाख रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. यासंंबंधी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.