सर्वोच्च न्यायालयाने तमनारप्रकरणी स्वीकारली ‘सीईसी’ची शिफारस

0
17

सर्वोच्च न्यायालयाने मोले अभयारण्यातून घालण्यात येणार्‍या गोवा तमनार ४४० केव्ही वीज वाहिनीसंबंधी केंद्रीय उच्च अधिकार समितीची शिफारस स्वीकारली आहे. सध्याच्या वीज वाहिनीच्या जवळून नवीन वीज वाहिनी घातल्यास आणखीन वन जमिनीतील झाडांची हानी होणार नाही, असे सीईसीच्या अहवालात म्हटले आहे.

केंद्रीय उच्च अधिकार समितीने २२० केव्ही वीज वाहिनीच्या जवळून नवीन ४४० केव्ही वीज वाहिनी घालण्याची शिफारस केली आहे. गोवा फाउंडेशनने महावीर अभयारण्य, मोले राष्ट्रीय पार्कमधील प्रस्तावित तीन प्रकल्पाबाबत अर्ज सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अभयारण्यातील राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि तनमार वीजवाहिनीचा अभ्यास करण्यासाठी सीईसीची नियुक्ती केली होती. या समितीने गोव्याला भेट देऊन तिन्ही प्रकल्पांच्या जागांची पाहणी केली. समितीने एप्रिल २०२१ मध्ये अहवाल सादर केला. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण या विषयावर नंतर सुनावणी घेतली जाणार आहे.