सर्वोच्च न्यायालयातील खाण सुनावणी ९ रोजी

0
92

सर्वोच्च न्यायालयातील राज्यातील खाण प्रश्‍नीच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एका तहकूब करण्यात आली असून येत्या ९ सप्टेंबर रोजी ती घेतली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नी दोन खाण कंपन्यांकडून याचिका दाखल केलेली आहे. राज्य सरकारने सुध्दा हस्तक्षेप याचिता दाखल केलेली आहे. या याचिकेवर बुधवार २६ ऑगस्टला सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती.

तथापि, ही सुनावणी पुढे ढकलून २८ ऑगस्टला घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. तथापि, २८ ऑगस्टला खाण प्रश्‍नी याचिकेवर सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. खाण प्रश्‍नी याचिकेत खाण व्याप्त भागातील ग्रामपंचायतींनी हस्तक्षेप याचिका दाखल करून आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली आहे.