सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारवर ताशेरे

0
6

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी नागालँडमधील महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ज्या राज्यांमध्ये भाजपच सरकार आहे, तिथे कारवाई करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरते; मात्र जिथे बिगर भाजप सरकार आहे, तिथे केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलली जातात, असे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदवले. तुम्ही तुमच्याच पक्षाच्या (भाजप) राज्य सरकारांविरुद्ध कारवाई का करत नाही? ज्या राज्यात तुमचे सरकार नाही, तिथे तुम्ही कठोर भूमिका घेता; पण ज्या राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आहे, तिथे काहीही पावले उचलत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारवर ताशेरे ओढले.