सराफी दुकान फोडीप्रकरणी सिंधुदुर्गातून चौघांना अटक

0
12

म्हापशातील ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ या सराफी दुकानातील चोरीचा छडा लागला असून, म्हापसा पोलिसांनी सिंधुदुर्गमध्ये या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांना लवकरच म्हापशात आणण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांची नावे स्पष्ट होऊ शकणार आहेत.
म्हापसा बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणी असलेले चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीचे नास्नोडकर ज्वेलर्स हे सराफी दुकान चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री 2 ते सोमवारी पहाटे 4 वाच्या दरम्यान फोडले होते. चोरट्यांनी कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. अवघ्या एका आठवड्याच्या आत म्हापसा पोलिसांना या सराफी दुकानातील चोरीचा छडा लावण्यास यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना सिंधुदुर्गमधून ताब्यात घेतले असून, त्यांना गोव्यात आणले जात आहे.