सरकार जमीन विकास धोरण शिथिल करणार

0
10

राज्यात सर्वसमावेशक आणि परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून जमीन विकास धोरण शिथिल केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या नगर आणि नियोजन खात्याने गोवा (जमीन विकास आणि इमारत बांधकाम) शिथिलता नियम – 2023 सरकारी राजपत्रात जाहीर केले आहेत.
राज्यात परवडणाऱ्या घरांचे बांधकाम 60 चौरस मीटरपर्यंतच्या जागेत करण्यास मान्यता दिली जाणार आहे.
नवीन भूखंड योजनांमध्ये 1 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांमध्ये 70 टक्के भूखंड 100 चौरस मीटर पेक्षा कमी नसावेत आणि उर्वरित भूखंडाचा किमान आकार 150 चौरस मीटर पेक्षा कमी नसावा, असे सूचनेत म्हटले आहे.
या भूखंडामध्ये घर बांधण्यासाठी नियम शिथिल केले जाऊ शकतात. या जागेत तळमजला आणि एक मजल्यापर्यंत घराचे बांधकाम केले जाऊ शकते. अशा प्रकारच्या घरांच्या विकासामध्ये मोकळ्या जागेत पार्किंग क्षेत्र स्वतंत्रपणे निश्चित केले जाणार आहे.