वेगवेगळ्या न्यायालयीन सरकारी वकील व एपीपीची पदे लवकरच भरण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत लवू मामलेदार यांनी शून्य तासावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दिले. त्याचप्रमाणे ८६ पोलीस उपनिरीक्षकांची लवकरच वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रश्नावर दिले. डॉ. सावंत यांनी शून्य तासावेळी कुडणे, नावेली परिसरात चोर्या होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.