सरकारी योजना जनतेपर्यंत नेण्यासाठी समाजमाध्यम प्रभावकांची मदत घेणार

0
7

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा सरकारच्या विविध योजनांविषयी लोकांमध्ये जागृी घडवून आणणारी माहिती समाज माध्यमांवरुन देण्यासाठी तसेच पर्यटन राज्य असलेल्या गोव्याच्या अन्य विविध पैलूंवरही समाज माध्यमांद्वारे उजेड टाकण्यासाठी गोवा सरकार समाज माध्यम प्रभावकांची मदत घेणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिली. या योजनेसाठी 2 कोटी रु.ची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत फक्त राजस्थान ह्या एकाच राज्यात अशी योजना असल्याचे ते म्हणाले.

या योजनेसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, यूट्यूब आदी समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्ती इएसजीच्या पोर्टलवर काल बुधवारी 5 वाजल्यापासून नोंदणी सुरू झाली असून ही नोंदणी 14 फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोंदणी केलेल्या प्रभावकांची लोकप्रियता व त्यांना मिळालेले लाईक्स व सबस्क्राइब्रर्स यांच्या आधारे त्यांची निवड करुन त्यांना एमपेनल्ड करण्यात येणार असल्याचे सावंत यानी सांगितले. अर्ज करण्यासाठी 15 वर्षांच्या निवासी दाखला सक्तीचा असल्याचे ते म्हणाले.