सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमांतील सहभागावर बंदी नाही

0
7

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर घातलेली बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. 9 जुलै रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा आदेश भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. 1966 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संदर्भात निर्णय घेतला होता. 58 वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली आहे.