सरकारी कर्मचार्‍यांसाठी कदंबची मर्यादित बससेवा

0
126

 

गेल्या दोन दिवसांपासून सरकारी कार्यालये सुरू झालेली असल्यामुळे या सरकारी कर्मचार्‍यांसाठी विविध ठिकाणाहून राजधानी पणजीत ने-आण करण्यासाठी कदंबने मर्यादित वेळेसाठी आपली बससेवा सुरू केली आहे.

मडगाव कदंब बसस्थानकावरून सकाळी ८ पासून बससेवा सुरू होत असून ती ९.३० पर्यंत सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पणजीत जाणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ही बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. नंतर मधल्या काळात मात्र प्रवासी नसल्याने ही बससेवा मर्यादित काळासाठी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काणकोण, कुडचडे, सावर्डे, सांगे, केपे, फोंडा, मडगाव या दक्षिण गोव्यातील भागांतून पणजीला सध्या ४६ कदंब बस जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.