राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून सरकारी कर्मचार्यांच्या डी. ए. मध्ये ३४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्यांना हा निर्णय लागू होणार आहे. सरकारी कर्मचार्यांच्या एप्रिल २०२२ च्या पगारात जानेवारी ते मार्च २०२२ पर्यंतची थकबाकी दिली जाणार आहे. यासंबंधीचा आदेश वित्त (खर्च) खात्याने काल जारी केला आहे.