सरकारला मार्गदर्शनासाठी गाभा समितीची स्थापना

0
86

महत्त्वाच्या प्रश्‍नांवर नव्या सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक गाभा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही गाभा समिती केवळ महत्त्वाच्या प्रश्‍नांवरून सरकारला मार्गदर्शन करेल. खास करून धोरणात्मक निर्णयाबाबत ही समिती सरकारला मार्गदर्शन करेल. गाभा समितीच्या अध्यक्षस्थानी आपण असेन, असे पर्रीकर म्हणाले. त्याशिवाय भाजपचे सरचिटणीस तसेच अन्य पदाधिकारी समितीवर असतील.
पक्षाचे जे धोरण आहे त्यानुसार सरकारने प्रशासन द्यायचे असते. पक्षाशी सुसंगत असेच निर्णय सरकारला घ्यावे लागतात. पक्षाला तुम्ही बाजूला टाकू शकत नाहीत. कुळ-मुंडकार कायदा दुरुस्ती यासारखे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा गाभा समिती सरकारला मार्गदर्शन करेल, असे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
गाभा समितीवर पर्रीकर, मुख्यमंत्री पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व अन्य पदाधिकारी असतील.