गोव्यात भाजप सरकार स्थापनेचे एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याशिवाय या सरकारने काहीही केले नाही. गोवा ही उजव्या विचारांच्या लोकांची प्रयोग शाळा करून सोडल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केला. या सरकारने एका बाजूने महिलांना गृहआधार दिला व दुसर्या बाजूने वीजेचे दर कितीतरी पटीनी वाढविले. राज्यात मध्यमवर्गीयांची स्थिती बिकट बनली आहे. प्रत्येक प्रश्नावर सरकारने ‘युटर्न’ घेतल्याचे सांगून किनारी भागातील भाजपचे नेते व अंमली पदार्थ व्यवहारातील लोक यांच्या संगनमताने अंमली पदार्थांचा गैर व्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.