राज्य सरकारने कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले आर्थिक निर्बंध मागे घेणारा आदेश काल जारी करण्यात आला आहे. येत्या १ डिसेंबर २०२० पासून आर्थिक निर्बंधाचा आदेश मागे घेतला जाणार आहे, असे वित्त खात्याचे अवर सचिव प्रणब भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी १० जून २०२० रोजी आर्थिक निर्बंध लागू करण्यात आले होते.