सरकारकडून होम स्टे धोरण अधिसूचित

0
21

पर्यटकांना होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट द्वारे सेवा प्रमाणित करण्यासाठी आणि राज्याच्या निवास पर्यायांच्या उपलब्धतेला पूरक म्हणून गोवा सरकारने होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट धोरण काल अधिसूचित केले. धोरणाचा प्राथमिक लक्ष्य राज्याच्या ग्रामीण भागात पर्यटनाला चालना देणे हा असल्याने, सध्या केवळ सत्तरी, धारबांदोडा, सांगे, डिचोली, फोंडा, केपे आणि काणकोण तालुक्यांतील होमस्टे आणि बी अँड बी यांना आर्थिक प्रोत्साहन लागू असणार आहे.