समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी

0
232

राज्यातील समुद्र किनार्‍यावर पर्यटक आणि नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती.
कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी नसल्याने देशाच्या विविध भागांतील देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत. बहुतांश पर्यटक स्वतःची वाहने घेऊन आले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. हॉटेल व इतर ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी संगीत नृत्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते.