समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

0
3

नागपूर-महाराष्ट्र येथील प्रणय थोळ (32) ह्या पर्यटकाचा काल पाटणे-काणकोण येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. तो आपल्या मेहुण्याबरोबर गोव्यात पर्यटनासाठी आला होता. ते दोघेही समुद्राच्या पाण्यात उतरल्यानंतर प्रणय हा बुडाला. त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढून काणकोण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.