समुद्रकिनारे जीव रक्षकांविना

0
128
निदर्शने करणारे जीवरक्षक

जीवरक्षक संपावर : एज्मा लागू होत नसल्याचा संघटनेचा दावा
ऐन पर्यटन हंगामात आपल्या मागण्या धसास लावण्यासाठी ‘दृष्टी’ च्या सर्व जीवरक्षकांनी कालपासून संपावर गेल्याने राज्यातील समुद्र किनार्‍यांवर एकही जीवरक्षक नव्हता. सर्व जीवरक्षक येथील जकात खात्याच्या इमारतीसमोर धरणे धरून बसले आहेत.या कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन दिले जात नव्हते. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे कर्मचार्‍यांना सेवेतून वगळले जात होते. जीवरक्षकांमध्ये शंभर टक्के गोमंतकीय असून त्यांना सेवा नियम लागू करून वेतनात वाढ करण्याची त्यांची मागणी आहे. जीवरक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने एज्मा कायदा लागू करून संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. एज्मा कायदा सरकारी कर्मचार्‍यांनाच लागू होतो. कंत्राटदारतर्फे सेवा देणार्‍यांना तो लागू होत नाही, असे सांगून राज्यातील मोटरसायकल पायलट संपावर गेल्यास त्यांना एज्मा लागू करणार काय, सा प्रश्‍न आयटक नेते राजू मंगेशकर यांनी केला आहे.