समीक्षक डॉ. वासुदेव सावंत यांचे पुणे येथे निधन

0
21

गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव सावंत यांचे पुणे येथे काल निधन झाले. डॉ. सावंत यांनी सामाजिक अंगाने कादंबरी समीक्षेचे प्रारूप कसे असावे या वस्तुपाठ घातला. त्यांनी उदाहरणार्थ कोसला या विविधांगी समीक्षा पुस्तकातून संशोधन विषयाला नवीन वळण दिले. डॉ. सावंत कुठल्याही विषयावर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करीत असत.