समिती सांगेल, तिथे खाप्रेश्वराचे मंदिर बांधू

0
2

पर्वरी येथील खाप्रेश्वर मंदिराच्या सीमारेखांच्या आत मंदिर बांधण्याचे आश्वासन काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. त्याशिवाय या मंदिराची समिती जेथे ठरवल, तेथे नवे मंदिर बांधण्याचे आश्वासनही त्यांनी खाप्रेश्वर मंदिर समितीला दिले. पर्वरी मतदारसंघाचे आमदार रोहन खंवटे यांच्या नेतृत्त्वाखाली देव खाप्रेश्वर सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वरील आश्वासन दिले. या शिष्टमंडळात सुकूर पंचायत सदस्यांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाने काल आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खाप्रेश्वर देवाचे मंदिर तसेच वटवृक्ष हटवण्याचे काम चालू असताना ज्या भाविकांनी व पर्यावरणवाद्यानी आंदोलन छेडले होते व कामास अडथळा आणला होता. त्यांच्याविरूद्ध सार्वजनिक बांधकाम खात्याने तक्रार केलेली असली, तरी त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये, अशी सूचनाही खंवटे यांनी केली.