आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली असून, हा कायदा मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही मुस्लीम महिलेला तिच्या नवर्याने तीन विवाह करावेत, असे वाटत नाही. समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर पुरुष अनेक लग्ने करत राहतील आणि त्यामुळे महिलांच्या मुलभूत हक्कांवर गदा येईल, असेही त्यांनी नमूद केले. औवेसी मुस्लीम नेते आहेत. मात्र, दुर्दैवाने मी त्यांना कायम मुस्लीम महिलांच्या विरोधात बोलताना पाहिले आहे. देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना मुस्लीम महिलांना सन्मानाचे आयुष्य देण्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुस्लीम महिलांच्या आयुष्यात चांगले बदल होतील, असेही ते म्हणाले.