गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आठ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खास याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाने चोडणकर यांच्या एका याचिकेला अनुसरून गोवा विधानसभेचे सभापती आणि फुटीर 8 आमदारांना काल नोटीस बजावली. या प्रकरणात सुनावणीस दिरंगाई होत असल्याचे नमूद करत ही याचिका चोडणकर यांनी दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी दाखल केलेली खास याचिका न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन भट्टी यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणीला आली.