सन 2023 मध्ये आगीच्या घटनांत 136 जणांचा मृत्यू

0
5

2023 साली राज्यात आगीच्या व अन्य आणीबाणीच्या घटनांत 136 जणांचा मृत्यूझाला. त्याशिवाय 65 प्राण्यांचेही प्राण गेले व 8 कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.
दलाच्या जवानांनी आगीच्या व अन्य आणीबाणीच्या घटनात संकटात सापडलेल्या 190 जणांचे प्राण वाचवले तसेच 36.21 कोटी रु. ची मालमत्ताही नष्ट होण्यापासून वाचवली.

1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान अग्नीशामन दलाला आणीबाणीसंबंधीचे एकूण 9132 कॉल्स आले. त्यापैकी 4320 कॉल्स हे आगीच्या दुर्घटनेसंबंधीची होती. तर 2742 कॉल्स हे हवामानाशी संबंधीत होती. 2031 हे अन्य प्रकारच्या आणीबाणीसंबंधीची तर 15 पाण्यासंबंधीच्या दुर्घटनेचे होते. तर अन्य 14 जमिनीच्या दुर्घटनासंबंधीची होते.त्यापैकी सर्वांत जास्त 925 कॉल्स हे म्हापसा येथून आले होते. दलाने गेल्या वर्षी 690 प्राण्यांना वाचवले.