सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडिया आघाडीचा हेतू : मोदी

0
5

जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक असलेल्या सनातन धर्माचा पाया उद्ध्वस्त करण्याचा घमंडिया युतीचा दुष्ट हेतू आहे. या इंडिया आघाडीतील लोकांना स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांना प्रेरित करणारा सनातन धर्म पुसून टाकायचा आहे. त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बीना रिफायनरी पायाभरणी प्रकल्पावेळी ते बोलत होते.

आज त्यांनी खुलेआम सनातन धर्माला लक्ष्य केले आहे. उद्या ते आमच्यावर हल्ले करतील. देशातील तमाम सनातनी आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आता सावध राहायला हवे. आम्हाला अशा लोकांना रोखावे लागेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
घमंडिया आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यांच्याकडे ना धोरणे आहेत, ना मुद्दे आहेत आणि ना नेता आहे. सनातन धर्मावर हल्ला करण्याचा त्यांचा छुपा अजेंडा आहे. या धर्माचा त्यांना नाश करायचा आहे, असा आरोपही मोदींनी केला.