पणजी (सां. प्र.)
सनशाइन (वर्ल्ड वाईड) स्कूल गोवा हे आता पारंपरिक चार भिंतीच्या वर्गात बंदिस्त न राहता शिकणार्या समूहाशी जोडले जाणार आहे. सनशाइन स्कूलने टेक अव्हेंट-गार्ड ऍण्ड मायक्रोसॉफ्टशी भागिदारी करून मायक्रोसॉफ्ट अस्पायर स्कूल प्रोग्राम (एम. ए. एसपी) अवलंबला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानयुक्त आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या सोयीने समृद्ध विद्यासंकुल होईल व शिक्षणाच्या अनुभवाचा स्तर वाढणार आहे. याबाबत सनशाइन स्कूलमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
युनेस्कोच्या २०२० च्या दृष्टीनुसार ‘कनेक्टेड लर्निंग कम्युनिटी’मध्ये विद्यालयांचे रुपांतरण व्हायला हवे, त्यानुसार मायक्रोसॉफ्टचा अवलंब शिकवण्याचा व शिकण्याचा अनुभव उंचावणार आहे. या संदर्भात टेक अव्हेंट-गार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अली सैन व सनशाइन स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त दीपक खैतान, प्रशासक पारिजात सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला व माहिती दिली. सैत म्हणाले, २० शतकातील शिक्षण २१ व्या शतकापर्यंत पोचले आहे. त्यामुळे त्यात सर्जनात्मकता, संपर्कता, नाविन्य हे सर्व आले आहे. आम्ही अवलंबणार असलेले सॉफ्टवेअरद्वारे मुलांबरोबरच, शिक्षक-पालक यांचा स्तर उंचवायला मदत होणार आहे.
सनशाइन स्कूल हे अशा प्रकारचे शैक्षणिक रुपांतरण करणारे जगातील पहिले विद्यालय असावे, असे स्पष्ट करून सैत म्हणाले, काय करू नये हे सांगितले जाते परंतु काय करायला पाहिजे ते सांगण्याचा उद्देश आहे. दिपक खैतान यांनी सांगितले, सनशाइनमध्ये ९३० विद्यार्थी संख्या आहे. दोनशेच्या घरात शिक्षक आहेत. या मायक्रोसॉफ्टमुळे इतरत्र विद्यार्थ्यांनाही पॅकेज मिळणार आहे. तोच टॉपिक, तोच शिकवणारा शिक्षक इतर विद्यालयाशी जोडला जाणार आहे. हा प्रयोग करणारे आमचे एकमेव विद्यालय आहे व त्याचा अवलंब इतरांनीही केला तर आम्हाला आनंदच आहे. शिक्षणाचा दर्जा आम्हाला वाढवायचा आहे.
पारिजात सिन्हा यांनी सांगितले, आमच्या विद्यालयात कुणा विद्यार्थ्यांची स्पर्धा नसते. परंतु स्पर्धेला तोंड देणारे विद्यार्थी इथून निर्माण होतील, हे पाहिले जाते त्यांना चांगले वातावरण देणे, पारदर्शक व्यासपीठ देणे हे पाहिले जाते. पत्रकार परिषदेला मायक्रोसॉफ्ट तज्ज्ञ प्रशांत झा, पृथ्वी देसाई उपस्थित होत्या.