पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा इशारा
किनारी भागातील अमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यास पोलीस कमी पडले आहेत, हे आपण मान्य करतो. परंतु नववर्षाच्या काळात किनारी भागात होणार्या सनबर्न व सुपरसॉनिक या दोन्ही नृत्यरजनी महोत्सवात अमली पदार्थांचा गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे ठरविले आहे. अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे दिसून आल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल व यापुढे त्यांना महोत्सवाचे आयोजन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.अशा नृत्य रजनीमध्ये अमली पदार्थांचा गैरवापर होतच नाही असे म्हणण्याचे आपण धाडस करीत नाही. अमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पत्रकार तसेच नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीतही काळजी घेणार असल्याचे ते म्हणाले.