सनबर्न यंदा दक्षिण गोव्यात

0
9

सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल यावर्षी दक्षिण गोव्यात आयोजित करण्याची घोषणा आयोजिकांनी केली आहे. हा संगीत महोत्सव दक्षिण गोव्यात 28 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात गेली कित्येक वर्षे उत्तर गोव्यातील किनारी भागात सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात होते. गतवर्षी झालेला सनबर्न संगीत महोत्सव हा गोव्यातील अखेरचा असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता आयोजकांनी उत्तर गोवा सोडून आता दक्षिण गोव्यात हा महोत्सव आयोजित करण्याचे घोषित केले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दक्षिण गोव्यात सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यात विरोध केला आहे. दक्षिण गोव्यात सनबर्न होऊ देणार नाही, असे आलेमाव यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.