सनबर्न महोत्सवप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

0
2

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सनबर्न संगीत महोत्सवासंबंधीच्या याचिकेवर बुधवारी (दि.18) सुनावणी होणार आहे.
धारगळ येथील खाजगी जागेत सनबर्न ईडीएम संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात असून, त्या जागेतील डोंगर कापण्यात आलेला नाही, अशी माहिती सरकारच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली आहे.
याचिकेद्वारे धारगळ ग्रामपंचायतीने सनबर्न संगीत महोत्सवाला दिलेल्या तत्त्वतः दाखल्याला आव्हान देण्यात आले आहे.