राज्य सरकारकडून वागातोर येथे 28 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सवातील ध्वनिप्रदूषण देखरेख आणि नियंत्रणाचा कृती आराखडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गुरुवारी सादर केला जाणार आहे.
गोवा खंडपीठात सनबर्न संगीत महोत्सवाबाबत त्याच परिसरात राहणाऱ्या एका दिव्यांग मुलाच्या वतीने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गोवा सरकारला कृती आराखड्यात मुलाच्या वतीने सादर केलेल्या सूचनांचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने कृती आराखडा आणि मोठ्या कार्यक्रमांना दिलेल्या परवानग्यांबाबत एक उच्चस्तरीय विशेष विभागाची स्थापना केली आहे. या विशेष विभागात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि गोवा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पर्यटन खात्याने वागातोर येथे सनबर्न महोत्सवाच्या आयोजनाला ‘ना हरकत दाखला’ दिला आहे. या महोत्सवात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलिसांनी कृती आराखडा तयार केला आहे. न्यायालयाने सनबर्न संगीत महोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत कृती आराखडा सादर करण्याचा निर्देश दिलेले होते.