सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून नोटीस

0
9

सरकारी कर्मचारी समूह वैद्यकीय विमा गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यासाठी आपण 27 ते 29 दरम्यान उपलब्ध असल्याचे मलिक यांनी सीबीआयला कळविले आहे. सीबीआयने त्यांना या प्रकरणात प्रश्नावली पाठवून दि. 28 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समूह वैद्यकीय विमा योजनेचे कंत्राट आणि किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित 2,200 कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकणात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने दोन गुन्हेही दाखल केले होते.