सचिन वाझेप्रकरणी एनआयएने काल आणखी एक मर्सिडीज गाडी जप्त केली असून त्या गाडीची कसून तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत एक स्कार्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि दोन मर्सिडीज अशा पाच गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. एनआयएच्या अधिकार्यांनी काल गुरूवारी दुपारी ही दुसरी मर्सिडीज गाडी जप्त केली. ही गाडी जप्त करून एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.
या प्रकरणात एनआयएने सर्वप्रथम स्कॉर्पिओ जीप जप्त केली होती. ताब्यात घेतलेल्या पहिल्या मर्सिडीजमधून केरोसीनसह ५ लाख रुपये रोख, तसेच एक पैसे मोजण्याचे मशीन व एक शर्टदेखील सापडला होता