राजस्थानातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस आणखी चिघळत आहे. रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी आव्हान याचिका दाखल करताच सचिन पायलट समर्थकांनीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
राजस्थानात कॉंग्रेसमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्यानंतर सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांनी बंडखोरी केली होती.