राज्यात चोवीस तासांत नवीन ११ कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय रुग्णसंख्या शंभरच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात सध्या ९८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ६८६ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात ११ नवे कोरोना रुग्ण सापडले. चोवीस तासांत आणखी १२ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४० टक्के एवढे आहे.