संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शिवसेनेच्या खासदारांची आसन व्यवस्था आता विरोधी सदस्यांच्या बाजूने करण्यात आल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत हे एकमेव मंत्री होते. त्यांनी पदाचा राजिनामा दिल्यानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपने यासंदर्भात काल अधिकृत जाहीर केले. महाराष्ट्रात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती केल्याने तसेच शिवसेनेच्या मंत्र्याने केंद्रीय मंत्रिपदाचा राजिनामा दिल्याने संसदेत शिवसेना सदस्यांची जागा विरोधकांच्या बाजूने करण्यात आली आहे असे जोशी म्हणाले.