संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारी रोजी सुरुवात होणार असून 9फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या बजेटमध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याचीदेखील शक्यता आहे. नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला. संसदे सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात विधान करावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष करत होते. त्यावेळी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 100 हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले.