संशयित आरोपीस पोलीस कोठडी

0
25

>> बिठ्ठोणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पर्वरी बिठठोणमधील एका अल्पवयीन मुलीला तिच्याच शेजारी रहात असलेल्या संशयित जावेद शेख ऊर्फ कबीर याने फूस लावून जबरदस्तीने कारमध्ये कोंबून वेरे येथे नेत तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी संशयित कबीर याला काल रविवारी पोलिसांनी ताब्यात घेऊन म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर अत्याचाराची घटना दीपावलीच्या आदल्या रात्री घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नरकासुर दाखवण्याची लालूच दाखवून त्या मुलीला जबरदस्तीने कारमधून वेरे येथे नेऊन अत्याचार करून तिला पुन्हा घरी आणून सोडले. मात्र या प्रकारामुळे पीडित मुलगी भयभीत झाली आणि बदनामीच्या भीतीने तिने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. यात तिचा एक पाय फ्रॅक्चर झाला असून दुसर्‍या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी तिला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी तिच्या भावाने पर्वरी पोलिसांत कबीरविरोधात तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी आरोपीला हाळीवाडा येथून शनिवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.