आरोग्यमंत्र्यांची माहिती
इबोला व्हायरसमुळे येणार्या ज्वराच्या बाबतीत आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जनतेला एक प्रकारची सूचना दिली आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. त्यामुळे या रोगाची लागण झाल्याचा संशय आल्यास आरोग्य खात्याला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले.
दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये हा रोग सध्या मर्यादित आहे. या रोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्ताशी संपर्क आला तरच तो इतरांना होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना २१ दिवसपर्यंत अलिप्त ठेवणे आवश्यक आहे. तशी व्यवस्था तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
इबोला व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णांना आरबीशी फुटतात. वेगवेगळ्या भागातून रक्तस्राव होणे व स्नायू दुखणे ही या रोगाची लक्षणे असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. सुरुवातीस या रोगाच्या बाबतीत माहिती नसल्यामुळेच गोंधळ निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.