एमव्ही लकी ७ कॅसिनो जहाज मिरामार समुद्र किनार्यानजीक रूतल्याने तेलगळती होऊन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे वरील जहाज आणण्यास मान्यता देणार्यांना व जहाजाच्या मालकांना अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
या वादग्रस्त कॅसिनोला निसर्गाने धडा शिकविला. सरकारातील राजकीय लोक जहाज आणण्यासाठी परवाना द्यावा म्हणून बंदर कप्तानांवर दबाव आणित होते. या पार्श्वमूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सरकारची भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.