संजीव खन्ना 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध

0
5

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. याआधी त्यांनी ऐतिसहासिक ठरणाऱ्या अनेक खटल्यांचा निकाल दिलेला आहे. कलम 370 रद्द करणे, निवडणूक रोखेण रद्द करणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे सदस्य होते. देशाचे 50 वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले, त्यानंतर संजीव खन्ना यांनी काल पदभार स्वीकारला.

नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे 2025 पर्यंत म्हणजेच साधारण सहा महिने असणार आहे. संजीव खन्ना यांनी दिल्लीच्या मॉडर्न स्कूल आणि सेंट स्टिफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतलेे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी 1983 साली वकिलीला सुरुवात केली. 2005 साली ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली.