संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

0
6

दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक केलेल्या आपचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाने काल 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने 10 दिवसांची कोठडी मागितली होती; परंतु ती अमान्य करत न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी दिली.

मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करत ईडीने आपला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली. का ईडीने संजय सिंह यांना न्यायालयासमोर हजर केले.

संजय सिंह यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. संजय सिंह यांचा मोबाईल ताब्यात घेतलेला असताना आता त्यांची कोठडी कशासाठी हवी, असा सवाल न्यायालयाने ईडीला विचारला होता.

यावर ईडीने पैशांच्या देवाणघेवाणीचा हवाला देत ही रक्कम दोन कोटींची आहे. तसेच संजय सिंह यांचा कर्मचारी सर्वेश मिश्रा याने या व्यवहाराची कबुली दिली आहे. सरकारी साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोरा यानेच संजय सिंह यांना फोन करून पैसे मिळाले का, हे तपासले केले होते. याचबरोबर या प्रकरणातील आणखी तीन संशयितांसोबत एकत्र मिळून संजय सिंह यांची चौकशी करायची आहे, असे ईडीने न्यायालयास सांगितले. यानंतर न्यायालयाने संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली.

अदानींच्या नोकरांना घाबरत नाही : संजय सिंह
यानंतर संजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपवर आगपाखड केली. आपल्यावर सर्व आरोप चुकीचे आहेत. नरेंद्र मोदी हे अदानींचे नोकर असून, आम्ही अदानींच्या नोकराला घाबरत नाही. जेवढे अत्याचार करायचे आहेत, तेवढे करा. आम्ही तयार आहोत. काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली.