कला आणि संस्कृती खात्यात संगीत शिक्षकांची भरती करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काल आमदार विजय सरदेसाई यांनी केला. परीक्षेत अत्यंत कमी गुण पडलेल्या काही उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना उतीर्ण झालेल्यांच्या यादीत वर आणून त्यांची निवड करण्यात आली. संगीताचे ज्ञान नसलेले हे शिक्षक आता विद्यार्थ्यांना कसले संगीत शिकवतील, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला. संगीत कला आत्मसात करण्यासाठी मोठी तपस्या करावी लागते. त्यामुळे वशिलेबाजीद्वारे केलेली निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी यावेळी केली.