श्री कमलेश्वर हायस्कूलला कबड्डीत दुहेरी मुकुट

0
143

थिवी (न. प्र.)
क्रीडा आणि युवा व्यवहार खात्यातर्फे पेडणे तालुका १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये श्री कमलेश्वर हायस्कूल पेठेचावाडा कोरगाव यांनी श्री भगवती हायस्कूल पेडणे वर १५ वी १० गुणांनी मात करीत जेतेपद प्राप्त केले. चांदेल येथील हुतात्मा बापू गावस मेमोरियल सरकारी विद्यालयाने १३ वि ७ गुणांनी कमलेश्वर विद्यालय देऊळवाडा संघाला पराभूत करीत तृतीय स्थान पटकाविले. पंच म्हणून गोकुळदास खोर्जुवेकर, विठ्ठल चोडणकर, निखिल सावळ देसाई, प्रितेश केरकर, श्रद्धा ठाकूर, विश्‍वास कासार, तनुज परब, पल्लवी लाड, पूनम तिळवे यांनी काम पाहिले.
दरम्यान, १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत कोरगाव पेठेचावाडा येथील कमलेश्‍वर हायस्कूल विजयी ठरले. अंतिम सामन्यात पेडणेच्या व्हायकॉऊंट हायस्कूलला नमविले.
श्री कमलेश्‍वर हायस्कूल देऊळवाडा यांनी तृतीय स्थान प्राप्त झाले. पंच म्हणून विठ्ठल चोडणकर, गोकुळदास खोर्जुवेकर, विश्‍वास कासार, तनुज परब, श्रद्धा ठाकूर, दीप्तेश केरकर, निखिल सावळ देसाई, पल्लवी लाड, मनीषा परब यांनी काम पाहिले.
तालुका संयोजक उमेश फडते व सहकारी यांनी सामन्याचे आयोजन केले. सदर स्पर्धा सावळवाडा पेडणे येथे खेळवण्यात आली.