श्रीलंकेतील तुरुंगातील भारतीय मच्छीमारांचे आमरण उपोषण

0
72

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत मच्छीमारी केल्याप्रकरणी श्रीलंकेतील जाफना तुरुंगात असलेल्या ३८ भारतीय मच्छीमारांनी आपल्या सुटकेसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या अनुषंगाने जाफनातील भारतीय वकिलातीच्या अधिकार्‍यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात अंमली पदार्थ प्रकरणी श्रीलंकेतील तुरुंगात असलेल्या ५ भारतीयांची सुटका करण्यात आली होती. त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षा यांच्याकडून माफी मिळाल्याने त्यांची सुटका झाली होती.