श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात पाच भारतीय मच्छिमार जखमी

0
3

डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकन नौदलाच्या गोळीबारात 5 भारतीय मच्छिमार जखमी झाले. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमींपैकी 2 मच्छिमारांची प्रकृती गंभीर आहे, तर अन्य तिघांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गोळीबाराची गंभीर दखल घेतली आहे. भारताने कारवाईचा विरोध करत श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले आहे. श्रीलंकन नौदलाने केलेली कारवाई स्वीकारार्ह नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना कांगेसंतुरई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.