श्रीपाद नाईक यांनी मानले मतदारांचे आभार

0
34

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून देशाचा केलेला विकास पाहून लोकांनी आपणाला उत्तर गोव्यातून विजयी करून विजयाची डबल हॅट्रीक करण्याचा मान दिल्याची प्रतिक्रिया उत्तर गोव्यातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी काल आपल्या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. उत्तर गोव्यातील मतदारांनी मोठी आघाडी देऊन विजयी केल्याबद्दल आपण त्यांचा ऋणी असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशाचा तसेच गोव्याचा मोठा विकास झाला आहे. आणि त्यामुळे जनता भाजपला कौल देत असल्याचे नाईक म्हणाले.