येथील वर्दळीच्या लाल चौक भागात दहशतवाद्यांकडून काल करण्यात आलेल्या ग्रेनेड स्फोटात एका सीआरपीएफ उपनिरीक्षकासह आठ जण जखमी झाले.जखमी झालेल्यांत एका आठ वर्षाच्या मुलाचाही समावेश होता. जखमा किरकोळ होत्या, जखमींना नजीकच्या इस्पितळात नेऊन प्रथमोपचार देण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. शिवाय या परिसराची लगेच सुरक्षा फौजांनी घेराबंदी केली आहे. दरम्यान, स्फोट घडवलेल्या दहशतवाद्यांचा सीसीटीव्ही फूटेजद्वारे शोध सुरू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एका निवडणूक प्रचारसभेदरम्यान हल्ल्याचा कट उधळून लावला होता. श्रीनगरमध्ये १४ डिसेंबरला मतदान होत असून प्रचारास गती प्राप्त होत असतानाच हा स्फोट घडविण्यात आला आहे.